आमच्या “रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज” तर्फे कोल्हापूर जिल्हा महीला पोलीसांसाठी तयार केलेल्या हायटेक मोबाईल टाॅयलेट व्हॅनचा हस्तांतरण सोहळा मोठया दिमाखात अलंकार हाॅल येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. सदर मोबाईल व्हॅन ही बंदोबस्तासाठी कार्यरत महिला पोलिसांसाठी असुन त्यात प्रामुख्याने अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध असल्याने महिला पोलिसांना त्याचा बंदोबस्त काळात लाभ घेता येणार आहे.

सदर कार्यक्रमास रोटरी गवर्नर श्री. विनय पै-रायकर, रोटेरियन आमदार श्री. सतेज पाटील, विशेष पोलिस महानिरीक्षक श्री.विश्वास नांगरे-पाटील, जिल्हा पोलीस प्रमुख श्री. संजय मोहिते,होम डि.वाय. एस.पी.श्री सतिश माने,असि.गवर्नर श्री. शरद पाटील,श्री.शिशिर शिंदे तसेच रोटरी सनराईज चे सर्व पदाधिकारी,सदस्य,महिला पोलिस व अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.